विलास सोनवणे - लेख सूची

मराठा मोर्चे : एक आकलन

मराठा, अस्मिता, सामाजिक लढा, सत्याग्रह —————————————————————————– महाराष्ट्रात अलीकडच्या काळात निघालेल्या विराट् मराठा मोर्च्यांनी अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामागील समूहमानस समजून घेण्याचा हा एक प्रयत्न. ह्या विषयावर व्यापक चर्चा घडावी ह्या अपेक्षेने तोप्रकाशित करीत आहोत. —————————————————————————– कोपर्डी, जिल्हा – अहमदनगर येथे मराठा समाजातील एका गरीब आणि अल्पवयीन मुलीवर चार दलित तरुणांनी बलात्कार करून तिचा …

जातिव्यवस्था आणि न्यूनगंड

भारतीय समाजामध्ये जातिव्यवस्था खूप खोलवर रुजली आहे. त्याचे दूरगामी परिणाम आपल्या व्यावहारिक जगण्यावर तसेच मानसिकतेवरही झाले याहेत. जातिनिर्मूलनाचे अनेक प्रयत्न व चळवळी ह्या देशात झाल्या, त्याने थोडाफार फरक पडला, पण निर्मूलन झाले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक परिवर्तनासाठी ज्या ज्या संघटना उभारण्यात आल्या, त्यांचे स्वरूप वरकरणी जरी जातिभेद न मानणारे दिसत असले, तरी जातिव्यवस्थेने घडविलेल्या …

देवा-धर्माचे व्यापारीकरण आणि अंधश्रद्धा

आपल्या देशातील बुवा-बाबा-अम्मा यांच्या संख्येत गेल्या काही दशकात वेगाने वाढ झाली आहे. पुटपाथीच्या सत्यसाईबाबांचा तर विशेषच बोलबाला होता. त्या बाबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीची आतापर्यंत झालेली मोजदाद त्यांच्या नजीकच्या कोंडाळ्यातल्या लोकांनी त्यांच्या मृत्यू दरम्यान व मृत्यू पश्चात केलेल्या लुटा-लुटीनंतर देखील कित्येक लाख कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अलीकडेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या आसाराम नावाच्या बापूची …

हिंदू : भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद रेखाटणारी कादंबरी

हरितक्रांतीनंतर भांडवलाचा शिरकाव शेतीमध्ये झाला आणि शेती हळूहळू बाजारपेठेशी जोडली गेली. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकायला लागली. ती खेड्यांकडून शहराकडे आली आणि शहरांमध्ये आल्यानंतर शहरात ती ‘अनफिट’ ठरली. ही ‘अनफिट’ ठरलेली सगळी मंडळी नेमाडे यांच्या आधीच्या ‘कोसला’ व ‘चांगदेव चतुष्टय’ कादंबऱ्यांचे नायक आहेत. ही ‘अनफिट’ मंडळी समाजवाद्यांकडे, कम्युनिस्टांकडे गेली मात्र कुठेही ती फिट झाली नाहीत. …

भाषा व राजकारण

महाराष्ट्र राज्याची स्थापना हा भाषावार प्रांतरचनेचा कार्यक्रम होता हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. प्रत्यक्ष स्थापना जरी 1960 साली झाली असली तरी ह्या स्थापनेमागील उद्दिष्टे पाहण्यासाठी आपल्याला पुष्कळ मागे जावे लागेल. स्वातंत्र्यलढ्यात टिळक युगानंतर गांधी युग अवतरले तेव्हाच भाषावार प्रांतरचनेच्या संकल्पनेचा उद्भव झाल्याचे दिसते. सन 1940 मध्ये क्रिप्स मिशन आले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष मौ. अबुल कलाम …